मधुमेह या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो.आकडेवारीनुसार, जगभरात 50 कोटींहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. येत्या काही वर्षांत हा आकडा 130 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरण या संस्थेद्वारे 1991 मध्ये ही संकल्पना राबवण्यात आली. 1922 मध्ये चार्ल्स बेस्ट यांसोबत सर फ्रेडरिख बँटिंग यांनी इन्शुलीनचा शोध लावला. सर बँटिंग यांच्या 100 व्या जन्मदिनी जागतिक मधुमेह दिन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
नीलवलय हे जागतिक मधुमेह दिवसाचे संबोधचिन्ह ठरवण्यात आले. मधुमेह या आजाराविरुद्ध सामाजिक मोहिमेमध्ये सर्वांनी एकत्रितपणे सहभागी होणे, या संदेशाचे हे चिन्ह द्योतक आहे.
मधुमेह हा चयापचयसंबंधित विकार आहे. हा चिरकालीन आजार आहे म्हणजेच हळूहळू विकसित होतो. यामध्ये रक्तातील शर्करेमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक वाढ दिसून येते.
मधुमेह प्रकार - 1 हा प्रामुख्याने अल्पवयीन गटातील व्यक्तींमध्ये दिसून येतो. यामध्ये इन्शुलीनच्या उत्पादनात घट दिसून येते. प्रकार - 1 हा प्रतिबंधात्मक नाही, परंतु अंत:क्षेपणाद्वारे त्याचे नियंत्रण करता येते. तर मधुमेह प्रकार - 2 मध्ये स्वादुपिंडाद्वारे तयार झालेले इन्शुलीन शरीरातील पेशींद्वारे योग्य प्रमाणात वापरले जात नाही. दीर्घकालीन मधुमेहामुळे अंधत्व, वृक्क निष्क्रियता, हृदय विकार असे आजार उद्भवण्याची शक्यता असते. संतुलित आहार, नियमित शारीरिक व्यायाम, नियंत्रित वजन आणि धूम्रपान निषेध यांद्वारे मधुमेह या आजाराला प्रतिबंध घालता येतो. जागतिक मधुमेह दिवसाचा प्रसार करण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम आणि मधुमेह तपासणी शिबिर यांचे आयोजन केले जाते. तसेच विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. निळ्या रंगाचे कपडे परिधान करून सामूहिक व्यायामांचे आयोजन केले जाते. जागतिक मधुमेह दिनानिमित्त रूपरेखा आखल्या जातात.
■ प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इतक्या झपाट्याने वाढ झाल्याने व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे या आजाराबाबत जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून लोक प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करू शकतील. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता.
■ जागतिक मधुमेह दिनाची थीम
या वर्षीच्या जागतिक मधुमेह दिनाची थीम मधुमेहाच्या काळजीमध्ये प्रवेश आहे. याचा अर्थ मधुमेहाच्या रुग्णांवर शक्य तितके लक्ष दिले पाहिजे. लक्ष देऊन मधुमेहावर सहज नियंत्रण ठेवता येते आणि त्यास वाढण्यापासून रोखता येते.
■ जागतिक मधुमेह दिनाचे महत्त्व
जनजागृती करण्यासाठी मधुमेह दिन साजरा करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून प्रत्येकाला त्याची लक्षणे आणि उपचार केव्हा सुरू करावे हे कळेल. मधुमेहाशी लढण्यासाठी लोकांकडे आरोग्य सुविधा आहेत की नाही, याचीही माहिती यावेळी दिली जाते. जास्त वजन वाढणे धोकादायक आहे. जास्त वजन किंवा लठ्ठपणा वाढणे देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे मधुमेहाचा धोका कायम आहे.नियमित शारीरिक हालचालींव्यतिरिक्त, शरीराचे वजन 5 ते 10 टक्के कमी केल्याने मधुमेह होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी करता येतो.
जागतिक मधुमेह दिन विषयीची वरील माहिती आपणांस कशी वाटली तसेच काही चुका अथवा सुधारणा असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा
धन्यवाद...!!
Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!